मुंबई – महायुतीतील सामंजस्य टिकवून मुंबई सह राज्यातील महापालिका निवडणुकींना सामोरे जाण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, त्यामुळे महायुती म्हणून बोलणी आणि वाटाघाटी यासंदर्भातील निर्णय आज किंवा उद्या होईल,अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना दिली.
माझी चर्चा देशाचे नेते अमित शहा यांच्याशी झाले असून अमित साटम यांच्या बोलण्यावर मी प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही, असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मुंबईसह राज्यातील विविध महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची पक्षाच्या परिस्थितीचा आढावा घेत
प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांनी घेतला. तिथल्या पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,’ मुंबई महानगरपालिकासहीत इतर महानगरपालिकेत महायुती होण्याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्याशी रात्री चर्चा करेन आणि पुन्हा याविषयावर चर्चा करुन पुढची पावले महायुतीच्या दृष्टीकोनातून करता येऊ शकते हा प्रयत्न असणार आहे. नवाब मलिक हे आमच्या पक्षातंर्गत निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या बद्दल मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम काय म्हणाले यावर मी प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. देशाचे नेते अमित शहा यांच्याजवळ प्रफुल पटेल व मी चर्चा केली आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितद पवार आणि माझी चर्चा झाली आहे. त्यानंतर दादा मी व प्रफुल पटेल आम्ही सखोल चर्चा केली असली तरी पुन्हा एकदा दादांशी चर्चा करणार आहोत.
प्रदेशाध्यक्ष या नात्याने मुंबईसह सगळा विभाग माझ्या अखत्यारीत येतो हेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. असे सांगून तटकरे म्हणाले,’महायुती म्हणून लढावं हा आमचा प्रयत्न राहिल त्या प्रयत्नाचा भाग म्हणूनच मी कालपासून मुंबईत आहे. शनिवारी यावर सकारात्मक चर्चा करु आणि अंतिम निर्णय जो होईल तो आपल्यासमोर ठेवू असेही त्यांनी सांगितले.



























