अक्कलकोट – माजी मंत्री व शिवसेना नेते . सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाला अधिक बळ देण्यासाठी अक्कलकोटचे जेष्ठ शिवसैनिक, माजी नगरसेवक सुनिल कटारे यांची सोलापूर जिल्हा उपप्रमुख पदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीने शिवसैनिकात आनंद व्यक्त केला जात आहे .
सुनिल कटारे यांच्या जिल्हा उपप्रमुखपदी नियुक्तीचे अधिकृत नियुक्तीपत्र सोलापूर संपर्कप्रमुख . संजय कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या प्रसंगी सोलापूर जिल्हा प्रमुख अमर पाटील ,. सोलापुर शहर प्रमुख सुनिल चव्हाण ,अक्कलकोट तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील , अल्पसंख्यांक आघाडी जिल्हा प्रमुख शाकिर पटेल ‘ , इंद्रजीत गद्दी, . मोहसीन मोकाशी. आदि उपस्थित होते .


























