सांगोला – जीवनामध्ये सुखी, आनंदी व निरामय जीवन जगण्यासाठी दिवसाची सुरुवात ओम काराने करावी व याचे प्रात्यक्षिक सर्वाकडून करून घेऊनच, आनंदी जीवन जगा व यासाठी ध्यानधारणा गरजेचे आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष शिवानंद भरले यांनी केले. ते सांगोला तालुका पेन्शनर संघटनेच्या वतीने आयोजित पेन्शनर डे या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सेवानिवृत्त मयत शिक्षक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी पेन्शनर संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन शिवानंद भरले यांच्या शुभहस्ते व जिल्हाध्यक्ष सुभाष फुलारी, उपाध्यक्ष शंकर जाधव, कार्याध्यक्ष काळापा सुतार, संघटक शांतआप्पा कांबळे, संघटनेचे अध्यक्ष वसंत दिघे, सल्लागार शंकर सावंत, सिद्धेश्वर झाडबुके, दिनकर घोडके, विलास नलावडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी संघटनेतर्फे जागेचे मालक रविंद्र माने, कवी शिवाजी बंडगर, रविराज शेटे तसेच ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सेवानिवृत्त शिक्षक सदाशिव साबळे, जयवंत नागणे, महादेव चौगुले, शाहू गडहिरे, महादेव कांबळे, यशवंत मोहिते, पांडुरंग शिंदे, मनोहर शिंदे, गुंडाराम शिंदे, लक्ष्मण सावंत, सुमन सरगर, वसंत लिगाडे, आनंदा वाघमारे, सदाशिव कांबळे, मोहम्मद मुलानी, विठ्ठल मोहिते, अरविंद डोंबे, प्रभाकर कसबे, सुखदेव कदम, शंकर सावंत, सिद्धेश्वर झाडबुके यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंतराव दिघे, सूत्रसंचालन संचालिका प्रतिभा शेंडे व सिद्धेश्वर झाडबुके यांनी केले. आभार दत्तात्रय खामकर यांनी मानले.


























