माहूर – माहूर तालुक्यासह शहरातील
संविधानावर प्रेम करणारे, त्याचा आदर करणारे आणि संविधानातील मूल्यांचे (न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता) पालन करणाऱ्या सर्व नागरिकांसाठी अभिमानास्पद अशी ऐतिहासिक घडामोड बुधवार १७ रोजी घडली असून, माहूरकरांसाठी जो अतिशय संस्मरणीय असा क्षण ठरणार आहे.
शहरातील बहुप्रतीक्षित असलेल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न “डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक” निर्माण कामास अखेर सुरुवात झाली असून,या स्मारकाच्या कामाचे उद्घाटन नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
उद्घाटनप्रसंगी सामाजिक, राजकीय तसेच आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी समाजाच्या वतीने नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचा पुष्पहार व शाल देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक उभारणीचे महत्व सांगताना नगराध्यक्ष दोसानी म्हणाले कि,”डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ उभारण्यात येत असून,जी त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचा गौरव करते. जे सामाजिक न्याय आणि समानतेचे प्रतिक असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
पुढे बोलताना दोसानी म्हणाले कि,”डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महामानव,भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार,बोधिसत्व,
आधुनिक बुद्ध, समाजसुधारक, कायदेपंडित, अर्थतज्ञ, लोकनेते, दलित-शोषित-वंचित-स्त्रियांचे तारणहार अशा अनेक विशेषणांनी गौरवले जाते, जे त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे आणि दूरदृष्टीचे वर्णन करतात. त्यांनी शिक्षण, सामाजिक न्याय आणि राष्ट्राच्या उभारणीत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ही विशेषणे प्राप्त झाली आहेत.
हे स्मारक केवळ पुतळा नसून सामाजिक समता, बंधुता व न्यायाच्या विचारांना अभिवादन करणारे प्रेरणास्थान ठरणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ओळख नव्या पिढीला करून देणारे हे स्मारक माहूरच्या सामाजिक इतिहासात एक नवा अध्याय लिहिणार असल्याची भावना यावेळी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी बोलताना व्यक्त केली.
पुतळा स्मारकाचे काम सध्या जलद गतीने सुरू असून हे काम समाजाच्यावतीने प्रकाश गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. दर्जेदार साहित्य वापरून भक्कम व देखणे स्मारक उभारण्यात येणार असून, काम वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले
असल्याची माहिती प्रकाश गायकवाड यांनी यावेळी दिली.
आता प्रत्यक्षात या बहुप्रतिक्षित स्मारकाच्या कामाला सुरुवात झाल्याने संपूर्ण तालुका व लगतच्या परिसरासह शहरातील नागरिक, आंबेडकरी अनुयायी व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या वेळी उपनगराध्यक्ष नाना लाड,नगरसेवक प्रतिनिधी आकाश कांबळे,अपसर आली,इरफान सय्यद,माजी नगरसेवक दीपक कांबळे,
सिद्धार्थ तामगागडगे,प्रा.
विनोद कांबळे,रेणुकादास वानखेडे,सुभाष दवणे,डॉ. सत्यम गायकवाडयांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.


























