सोलापूर – निवडणूकीच्या पाश्वभूमीवर जोडभावी पेठ पोलिसांची मोठी कारवाई करण्यात आली असून स्मशान भूमीजवळ 5 नंग्या तलावरी हस्तगत करत 14 हजाराच्या मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
महापालिका निवडणुक होणार आहे. निवडणुकीच्या काळामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये तसेच निवडणुका या भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात म्हणुन पोलीस आयुक्त एम. राजकुमार तसेच पोलीस उप आयुक्त विजय कबाडे, सहा पोलीस आयुक्त पोमण साहेब यांनी वेळोवेळी बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेवुन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
शनिवारी गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, एक इसम धार-धार तलवारी घेवुन रुपाभवानी मंदीराकडे जाणाऱ्या लिंगायत स्मशानभुमीच्या कंपाउड जवळ येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने व.पो.नि. यांचे आदेशाने पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी लिंगायत स्मशानभुमी जवळ सापळा रचुन संशयीत इसमांस जागीच गराडा टाकुन पकडले. मल्लिनाथ गुरुलिंगप्पा निरगुडे, वय-43 वर्ष, राहणार 58, भवानीपेठ जम्मावस्ती, सोलापूर असे असे आरोपीचे नाव आहे. त्याचे ताब्यामध्ये अंदाजे 14000/- रुपयाचा मुद्देमाल एकुण 05 नग नंग्या तलवारी मॅनसह मिळुन आल्या.
पोलीस उप आयुक्त सो (गुन्हे) यांनी जमावबंदी आणि शस्त्रबंदीचा आदेश जारी केला असताना सदरचा इसम याने वरिल वर्णनाचे आणि किमंतीचे शस्त्र बेकायदेशीररित्या स्वताचे जवळ बाळगुन लोकसेवकांनी जारी केलेल्या शस्त्रबंदीच्या आदेशाचा भंग केला आहे. म्हणुन त्यांचे विरुध्द पो.कॉ दत्तात्रय दगडु काटे नेमणूक जोडभावीपेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपी मल्लिनाथ निरगुडे याचे विरुध्द जोडभावीपेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा नंबर 882/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम-37(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. आरोपीने सदर शस्त्रे कोठुन आणली, कोणास विक्री करणार होता तसेच यापुर्वी त्याने कोणा कोणास शस्त्राची विक्री केली आहे याबाबत तपास चालु आहे.
ही कामगीरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप आयुक्त विजय कबाडे, सहा पोलीस आयुक्त पोमण, व.पो.नि सुरज मुलाणी आणि पो.नि. (गुन्हे) मिसाळ यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि माहडीक, पो.हे.कॉ. खाजप्पा परसप्पा आरेनवरु, पो.हे.कॉ शितल अशोक शिवशरण, पो.हे.कॉ. शिवानंद लोहार, पो.हे. कॉ बसवराज स्वामी, पोशि दत्तात्रय दगडु काटे, पो.कॉ अभिजीत बाळासाहेब पवार, पो.कॉ निलेश मारुती घोगरे, पो. कॉ विठ्ठल काळजे, पो. कॉ सोमनाथ थिटे, पो.कॉ.दादासाहेब सरवदे या पथकाने पार पाडली आहे.

























