माहूर / नांदेड – माहूर येेथे हातगाडा चालवून मोलमजुरी करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे कादरभाई साईवाला यांचा अत्यंत हुशार आणि अभ्यासू मुलगा हनीफ साईवाला याने एमएससीआयटी अर्थात महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान प्रमाणपत्र परीक्षेत नांदेड जिल्ह्यातून द्वितीय तर माहूर तालुक्यातून अव्वल येण्याचा बहुमान मिळविला आहे. या यशाबद्दल मान्यवरांकडून अभिनंदन करत त्याचा यथोचित सत्कार करण्यात आला.
एमएस-सीआयटी हा महाराष्ट्र
एमकेसीएल द्वारे २००१ मध्ये सुरू केलेला माहिती तंत्रज्ञान (आयटी) साक्षरतेचा एक लोकप्रिय अभ्यासक्रम असून,जो लोकांना संगणक आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे मूलभूत ज्ञान देऊन त्यांना डिजिटल युगासाठी तयार करतो, ज्यामुळे नोकरीची तयारी आणि आत्मविश्वासात वाढ होते. यात संगणकाचे मूलभूत कौशल्ये, मायक्रोसॉफ्ट ऑफिस (वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट) आणि आता एआय साधनांचाही समावेश आहे, जो महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय कॉम्प्युटर कोर्स आहे.
एमएस-सीआयटी हा एक सर्वसमावेशक संगणक कोर्स असून,जो आजच्या युवापिढीला डिजिटल जगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक मूलभूत आणि प्रगत कौशल्ये शिकवतो.
माहूर येथे शासनाच्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन या शिक्षण प्रकारात एम एस बी टी इ अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत एम एस सी आय टी मध्ये दि.१६/१२/२०२५ रोजी विनायका कॉम्पुटर इन्स्टिट्यूट येथे पार पडलेल्या परीक्षेत एकूण ४६ विद्यार्थ्यांनी विनायका कम्प्युटरचे संचालक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा दिली. तर जिल्ह्यातून हजारों विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.
या परीक्षेत हनीफ साईवाला यांनीही परीक्षा दिली. हनिफ हा सुरुवातीपासूनच अभ्यासात अतिशय हुशार व अभ्यासू असल्याने त्याने एम एस सी आय टी परीक्षेत ९८ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून दुसरा येण्याचा बहुमान मिळविला तर तालुक्यातून त्याने प्रथम क्रमांक पटकविला.
हनीफ साईवालाचे वडील हे मोल मजुरीसह हातगाडा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. जेमतेम मिळकतीतूनही थोडीफार काटकसर करून त्यांनी मुलाच्या इच्छेप्रमाणे त्यास एम एस सी आय टी क्लासेस लावून दिले.
यावर अनिल जाधव सरांचे उचित मार्गदर्शन मिळाल्याने त्याने भरघोस यश संपादन केल्याचे त्याचे वडील कादर साईवाला यांनी सांगितले.यावेळी सत्कारासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.


























