सोलापूर : जनता बँकेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त बँकेच्या माढा शाखेतर्फे आयोजित ग्राहक मेळावा उत्साहात झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून माढा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मीनल साठे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे उपाध्यक्ष ऍड. मिलिंद कुलकर्णी होते. तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे माढा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मिनल साठे, मनकर्णिका पतसंस्थेचे चेअरमन झुंजार भांगे, लोकमंगल पतसंस्थेचे संचालक शहाजीराव साठे उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
प्रमुख पाहुण्यांचा सत्कार बँकेचे उपाध्यक्ष ऍड. मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात राजेंद्र फडतरे, भारत गवळी यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कर्ज मंजूरी पत्र देण्यात आले. याप्रसंगी बँकेच्या विविध कर्ज योजनांची व ठेवीची माहिती बँकेचे सिनीयर ऑफिसर सुहास मुळजकर यांनी दिली. या कार्यक्रमात मगन सावंत, मदन मुंगळे, सुधीर कुलकर्णी व अ. रहीम पठाण या खातेदारांनी मनोगत व्यक्त करताना बँकेच्या सेवेविषयी समाधान व्यक्त केले. तसेच व शाखाव्यवस्थापक दत्तात्रय मनसुखे यांच्या कामाचे कौतुक केले.
प्रमुख पाहुण्या मीनल साठे यांनी बँकेची सेवा चांगली असल्याचे आपल्या भाषणात नमूद केले. व बँकेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. श्री. भांगे व श्री. साठे यांनीही बँकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आपल्या समारोपाच्या भाषणात उपाध्यक्ष मिलिंद कुलकर्णी यांनी सर्व सभासद ग्राहक खातेदारांना बँकेच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. व माढा नगर परिषदेने पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घर बांधकाम योजना तयार केल्यास त्यासाठी बँक अर्थसहाय्य करेल, असे आश्वासन दिले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा ग्राहक मेळावा संपन्न झाला.
सुहास मुळजकर यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले. हा ग्राहक मेळावा यशस्वी करण्यासाठी शाखाव्यवस्थापक दत्तात्रय मनसुखे यांनी व शाखेतील सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.


























