जालना – पारध (शाहूराजा), ता. भोकरदन, जि. जालना येथे साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. रतन कदम उपस्थित होते. त्यांनी साने गुरुजींचा जीवनपरिचय सांगताना नमूद केले की, साने गुरुजी हे कृतिशील श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, थोर समाजसुधारक तसेच मराठी साहित्यातील प्रतिभावंत लेखक होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. समाजातील जातीभेद व अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट प्रथांना त्यांनी तीव्र विरोध केला.
“खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे” ही मानवतेची शिकवण देणारे वंदनीय स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी होत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन लक्कस होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, साने गुरुजींचे जीवन हे सुसंस्कारांची खाण होते. अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतही त्यांनी आपले मूल्य व संस्कार कधीही सोडले नाहीत. आपणही आपले जीवन प्रामाणिकपणे, विनम्रतेने व संवेदनशीलतेने जगावे, असा संदेश त्यांनी दिला. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी साने गुरुजी लिखित ‘श्यामची आई’ हे पुस्तक आवर्जून वाचावे, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी संस्थेचे सचिव श्री विक्रांत भैय्या श्रीवास्तव सहशिक्षक योगेश मोरे रवी तबडे श्री. दत्ता पाखरे, श्री. वैभव लोखंडे, श्री. सुनील सोनुने , श्री. संतोष सोनुने, श्रीमती नरोटे, श्रीमती देशमुख, श्रीमती झोरे, श्रीमती राऊत, स्मिता भारती तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री. विष्णू आल्हाट आणि शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























