मोहोळ – सीना नदीच्या पुरामुळे खंडित झालेला विद्युत पुरवठा अद्यापही चालू करण्यात आला नाही . त्यामुळे नदीकाठच्या गावातून संताप व्यक्त होत आहे.लवकर विद्युत पुरवठा सुरळीत केला नाही तर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचे इशारा देण्यात आला.
याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहर प्रमुख शाहू राजे देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे अभियंता यांना निवेदन देण्यात आले.
सीना नदीला मागील ३ महिन्यापूर्वी आलेल्या महापुरामुळे आष्टी, भांबेवाडी, शिरापूर यासह नदीकाठच्या १२ गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. काही अपवाद वगळता अद्यापही नदीकाठची गावे अंधारात आहेत . एक तर पुराने शेतकऱ्याची शेती उध्वस्त झाली. होती नव्हती तेवढी पिके वाहून गेली इतकंच काय जमीन ही खरडून गेली. अशा परिस्थितीत काहीतरी धडपड करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या शेतकऱ्याला शेतीची तर सोडा परंतु जनावरांना पाणी मिळणे ही मुश्किल झाले आहे. नवीन पिके घेण्यासाठी ज्वारी व हरभरा, जनावरांना चारा, ऊस लागवडीसाठी पाणी देणे गरजेचे असते. यासाठी विद्युत पुरवठा सुरू असल्याशिवाय शेतकऱ्याला कोणतीही कामे करता येत नाहीत अधिकारी नुसतीच आश्वासने देतात परंतु नदीकाठचा बराच भाग अंधारात आहे नदीकाठच्या १२ गावातील डीपी पोल तात्काळ उभा करण्याचे गरजेचे आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नये .अन्यथा८ ते १० दिवसांमध्ये वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल .असा इशारा मनसेचे मोहोळ शहर अध्यक्ष शाहूराजे देशमुख यांच्या नेतृत्वाखालीं उप आभियंता पटवेगार यांना देण्यात आले. यावेळी गावातील नागनाथ सोडगे, बबन खरात, किसन सोडगे, अभिमान खरात, गोदावरी सोडगे हे उपस्थित होते.


























