बिलोली / नांदेड – बिलोली तालुक्यातील पाचपिंपळी येथील कै. गंगाबाई रावसाहेब पाटील पाचपिंपळीकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात सोमवारी ३२५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. ज्यात ५२ रुग्ण हे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आयोजकांनी निरपेक्ष सेवेचा हा वारसा चालवीत आहेत.
बिलोली तालुक्यातील पाचपिंपळी येथील कै. गंगाबाई रावसाहेब पाटील यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जाते. त्याच अनुषंगाने यंदा सोमवारी या शिबिराचे आयोजन पाचपिंपळी येथे करण्यात आले. प्रारंभी या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. नेत्र लायन्स क्लब च्या तज्ञ डॉक्टरांनी येथील शिबिरात तपासणी केली. उद्घाटन कार्यक्रमास आनंदराव माली पाटील काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर, बिलोली पं.स.चे माजी उपसभापती शंकर यंकम, दिलीप पांढरे, सरपंच कमल किशोर जाधव, विजय जाधव, बिलोली शहर काँग्रेसचे अध्यक्ष वलिओद्दीन फारुखी, अमजद चाऊस, कासराळी ग्रामपंचायतचे सदस्य शिवा पाटील कासराळीकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक पांडुरंग रामपुरे, किशन कमळेकर यांच्यासह अनेक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.























