नायगाव / नांदेड – दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव येथील खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त दर्शनासाठी आलेल्या हजारो भावि क प्रवाशांसाठी नरसी बसस्थानका त महाराष्ट्र राज्य परिवहन महा मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी माणुसकी चा आदर्श घालून दिला आहे. बिलोली आगाराचे आगारप्रमुख नरसिंग निम्मनवाड यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी स्वखर्चातून महाप्रसादाचे आयोज न करून भाविकांची सेवा केली.
नायगांव तालुक्यातील नरसी हे महत्त्वाचे मध्यवर्ती ठिकाण असून येथील बसस्थानकातून नांदेड, देगलूर, मुखेड व बिलोली या चार आगारांच्या बसेस धावतात. या मार्गावरून दररोज हजारो प्रवासी लांब पल्ल्याच्या प्रवास करीत असून तिकीट विक्रीतून संबंधित आगारांना दरमहा कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते. नरसी बसस्थानक बिलोली आगाराच्या अखत्यारीत असून, प्रवाशांच्या सोयीसाठी येथे भौतिक सुविधा वाढविण्यावर आगारप्रमुख नरसिंग निम्मनवाड यांनी विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे सध्या नरसी बसस्थानकात नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येते.
सध्या माळेगाव येथील खंडोबा देवाची दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा सुरू असून, दर्शना साठी येणाऱ्या भाविक प्रवाशांच्या सोयीचा विचार करत दि. २६ डिसेंबर रोजी शुक्रवार सकाळी
खंडोबा देवाच्या प्रतिमेचे विधीवत पूजन व भंडार उधळून यळकोट यळकोट जय मल्हारच्या घोषणा देत नरसी बसस्थानका त खिचडी स्वरूपात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या महाप्रसादाचा लाभघेताना भाविकांनी समाधान आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
या उपक्रमात बिलोली आगाराती ल यात्रा प्रमुख शिवाजी श्रीरामे, वाहतूक निरीक्षक राजेश पवार, व्यंकटराव श्रीमंगले, चंद्रशेखर कोकणे, आजिस भाई,रावसाहेब गोदमवाड, कैलास पांचाळ, गणेश दुय्येवार, राजू आंबेकर, राजू मानेमोड यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. तसेच नरसी येथील सामाजिक कार्य कर्ते रमेश वासरे,राम खनपट्टे, पप्पू आकमवाड आदींनीही सहकार्य केले.
परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यां नी आपल्या कर्तव्यापलीकडे जाऊन केलेल्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, आगारप्रमुख नरसिंग निम्मनवाड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या यामहाप्रसादाच्या आयोजनामुळे एस.टी. महामंडळा ची सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.


























