सोलापूर – हिवाळा ऋतू आरोग्यासाठी अनेक प्रकारे आव्हानात्मक ठरतो. थंडीमुळे सर्दी-खोकला, त्वचेचा कोरडेपणा यासोबतच दात व तोंडाच्या आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम होतो. हिवाळ्यात दातांशी संबंधित समस्या वाढताना दिसतात. त्यामुळे या समस्यांची कारणे समजून घेऊन योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
हिवाळ्यातील सर्वसाधारण समस्या म्हणजे दातांची संवेदनशीलता थंड पाणी, थंड पेये किंवा गार वाऱ्यामुळे दातांमध्ये अचानक कळ येते. याचे मुख्य कारण म्हणजे थंडीमुळे हिरड्या आकुंचन पावतात व दातांचा आतील थर उघडा पडतो. त्यामुळे दात अधिक संवेदनशील बनतात.
दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे हिरड्यांची सूज व रक्तस्राव त्यासोबत दात किडणे, दात व हिरड्या मध्ये होणारा जंतूससर्ग. हिवाळ्यात लोक पाणी कमी पितात, त्यामुळे तोंड कोरडे राहते. लाळेचे प्रमाण कमी झाल्याने जंतुसंसर्ग वाढतो व हिरड्यांना सूज येते. यामुळे तोंडातून दुर्गंधी येणे, हिरड्या दुखणे व रक्त येणे अशा तक्रारी दिसून येतात.
याशिवाय तोंडातील कोरडेपणा हि पण एक सामान्य समस्या आहे. थंड हवामानात श्वासोच्छ्वास तोंडातून अधिक प्रमाणात घेतला जातो. त्यामुळे तोंड कोरडे पडते. लाळ कमी झाल्यास दातांची नैसर्गिक स्वच्छता होत नाही व दात किडण्याचा धोका वाढतो.लहान मुलं सतत कांहीतरी खात असतात, मुलांना गोड पदार्थ, चॉकलेट वगैरे खावयास आवडते. वेळीच पाणी पिऊन स्वच्छ न केल्याने दात दुखणं व किडण्याचं प्रमाण जास्त असतं.
हिवाळ्यात दातांच्या या समस्यांपासून बचाव करण्यासाठी काही सोप्या पण महत्त्वाच्या काळजीच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. सर्वप्रथम, दिवसातून किमान दोन वेळा दात घासणे आवश्यक आहे. फ्लुराईडयुक्त टूथपेस्टचा वापर करावा. संवेदनशील दातांसाठी विशेष टूथपेस्ट उपलब्ध असून ती वापरल्यास फायदा होतो.
दररोज कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात. शक्य असल्यास मिठाच्या कोमट पाण्याने गुळण्या केल्यास हिरड्यांची सूज कमी होते. थंड पदार्थ व अतिशय गार पाणी टाळावे. पाणी पिण्याचे प्रमाण वाढवून तोंडातील ओलावा टिकवावा.
तसेच, तंबाखू, गुटखा, सिगारेट यांचे सेवन टाळावे, कारण यामुळे हिरड्यांचे आजार वाढतात. आहारात कॅल्शियम, जीवनसत्त्व ‘C’ व ‘D’ यांचा समावेश करावा. दूध, फळे, हिरव्या भाज्या यांचे सेवन दात व हिरड्यांसाठी उपयुक्त ठरते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे दर सहा महिन्यांनी दंततज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. लहान समस्या वेळेवर ओळखल्यास मोठे त्रास टाळता येतात.
एकंदरीत, हिवाळ्यात दातांची योग्य काळजी घेतल्यास वेदना, संसर्ग व खर्चिक उपचार टाळता येऊ शकतात. आरोग्यदायी दात म्हणजेच आरोग्यदायी जीवनहे लक्षात ठेवून प्रत्येकाने दंतस्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
(दात दुखणारा व्यक्ती फोटो)
*****——-
फोटो.1
दात दुखत असेल तर सर्वप्रथम दंततज्ञाचा सल्ला घ्यावा.दातामधील अडकलेलं अन्न दातामध्ये पिन, काड्या वापर करू नये. दात किडलेलं असेल तर कीड काढणे, किंवा रुट कॅनल करून नविन कॅप घालून उपचार करता येतात. दुखणं आहें म्हणून पेन किलर गोळ्या सतत घेतल्याने शरिरावर विपरीत परिणाम होऊ शकतो वेळीच उपचार न घेतल्याने दातांची पूर्णता झिज होऊन दात निकामी होऊ शकतात.
डॉ. किरण राठोड.
दंतरोग तज्ञ,
विजयनिर्मल मल्टीस्पेशलीटी डेंटल हॉस्पिटल,
सोलापूर.
*******—-=-==========
फोटो. 2
आयुर्वेदानुसार दंतधावन म्हणून विधी सांगितला असे सकाळी उठल्यानंतर तोंडांत चिकटा असतो आयुर्वेदाने याला कफ म्हटले आहे तो कमी होण्यासाठी तुरट व कडू चवीची चुर्ण वापरतात त्यामुळे कफ कमी होतो तुरट रस हा हिरड्या आवळल्या जातात त्यामुळे त्या घट्ट होतात हा रस जंतुनाशक मुख दुर्गंधी नाशक म्हणून पण काम करतो
त्यात वापरली जाणाऱ्या वनस्पती म्हणजे वज्रदंती म्हणजे बकुळ त्याबरोबर वड, खैर,करंज निंब बेल उंबर आघाडा अशा वनस्पती पासून बनवलेले मंजन वापरावे
वैद्य प्रविण बिरजे.
आयुर्वेदाचार्य.
बिरजे हॉस्पिटल, सोलापूर.


























