कळंब / धाराशिव : तालुक्यातील सात्रा या गावच्या कन्या डॉ. कु. शितल महादेव शिंदे यांची वैद्यकीय नीट पी.जी. 2025 प्रवेश परीक्षेमधील गुणांनुसार नाशिक येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी.( रेडिओलाॅजी) या उच्च शिक्षणासाठी निवड झाली.त्याबद्दल मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड व मित्रपरिवाराने त्यांचा सत्कार केला.
डॉ. शितल शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण विद्याभवन कळंब येथे झाले. अकरावी व बारावी वर्गाचे शिक्षण राजर्षी शाहू काॅलेज लातूर मध्ये झाले.त्यांनी त्यांचे एम.बी.बी.एस.चे शिक्षण मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पूर्ण केले.त्यांच्या या उज्वल यशाचे श्रेय त्यांनी त्यांच्या आई, वडील व भाऊ यांना दिले.
या सत्कार कार्यक्रमास सात्रा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड , तात्यासाहेब सुरवसे , रमेश शिंदे, सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी पटणे व मान्यवर उपस्थित होते. या यशाबद्दल डॉक्टर शितल व शिंदे परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

























