कळंब / धाराशिव – शासकिय कार्यालयात विवीध कामाकरीता दिरंगाई केली जाते अशा आशयाच्या बातम्या आपण नेहमीच ऐकतो,पाहतो,आणि प्रशासना बाबत मनात एक प्रकारची चीड निर्माण होते,ही बाब नित्याचीच आहे.
मात्र त्याच प्रशासनात प्रामाणिक, कर्तव्यनीष्ठ,वेळेचे गांभीर्य जाणणारे अधिकारी व कर्मचारी ही आपल्या प्रशासनात मोठ्या संख्येने असतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे कळंब उपजिल्हाधिकारी कार्यालयातील कर्तव्यावर असणारे उपजिल्हाधिकारी मा.गणेश शिंदे, तहसिल कार्यालयातील नायब तहसीलदार गोपाल तापडीया,दिनेश मंडलीक,लिपीक अशोक जाधव यांनी दाखवलेली कार्यतत्परता.कळंब शहरातील विद्यार्थीनी कु.सुहाना मुस्ताक बागवान व कु.वैष्णवी प्रशांत दिक्षीत या दोन्ही विद्यार्थीनींची महाराष्ट्र सिईटी सेल मार्फत शासकिय व शासकीय कोट्यातून अनुक्रमे बीयुएमएस व बीवायएनएस या अभ्यासक्रमाकरीता डाॅ.एपीजे अब्दुल कलाम युनानी मेडीकल कॉलेज,येवला जि.नाशिक व शासकीय बीवायएनएस काॅलेज, कोल्हापूर येथे प्रवेश निश्चित झाला होता,याप्रसंगी कागदपत्रांच्या पडताळणीत नॅशनलीटी प्रमाणपत्र,उत्पन्न प्रमाणपत्र व नाॅनक्रिमीलेअर प्रमाणपत्रांच्या तृटीमुळे सदर दोन्ही विद्यार्थ्यांचे प्रवेशास अडचण निर्माण झाली होती,तसेच त्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच प्रस्तुत प्रमाणपत्रे सादर करण्याची व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची वेळ होती,वेळेत कागदपत्रांची पूर्तता न झालेस दोन्ही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष व मेहनत वाया जावून मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती.प्रस्तुत विद्यार्थ्यांचे पालकांनी ही येथील वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्राचे संचालक संतोष भांडे यांचे निदर्नास आणुन दिल्याबद्दल तातडीने कळंब येथील तहसिल कार्यालयातील नायब तहसीलदार गोपाल तापडिया यांना ही बाब सांगितली आणि तातडीने योग्य त्या सर्व कागदपत्रांच्या आधारे केवळ एकच तासात संबंधीत कागदपत्रे निर्गमीत केली,त्याचे पिडीएफ संबंधीत काॅलेजला वेळेत पाठवली,ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण झाली आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.हे एवढ्या गतीने झाले की,आणि सर्वांनी शिक्षण,वेळ,व त्यामागील कोणाच्यातरी लेकींचं भल होण्याची प्रचंड भावना महत्वाची ठरली,चांगल्या कामाला देवही धावुन येतो तसे याप्रसंगी घडले.
आज संबंधीत विद्यार्थी,पालक,व वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शक संतोष भांडे यांच्या वतीने संबंधित कार्यतत्पर अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.


























