हदगाव / नांदेड – येथील श्री. साईबाबा निवासी अपंग विद्यालयात दि.२६ डिसेंबर रोजी वीर बाल दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस श्री. गुरु गोविंद सिंगजी महाराजांचे सुपुत्र – साहिबजादे अजीत सिंग, जुझार सिंग, जोरावर सिंग व फतेह सिंग यांच्या अद्वितीय शौर्य, बलिदान व देशभक्तीच्या स्मरणार्थ साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वीर बालकांच्या इतिहासाची माहिती देण्यात आली. त्यांच्या त्यागातून धैर्य, सत्य, निष्ठा व राष्ट्रप्रेम यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी भाषण, कविता व विचारमंथनातून आपले मनोगत व्यक्त केले.
विद्यालयाच्या वतीने वीर बालकांच्या बलिदानास अभिवादन करण्यात आले. अशा प्रेरणादायी कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, नैतिक मूल्ये व आत्मविश्वास वाढीस लागतो, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.यावेळी श्री साईबाबा निवासी दिव्यांग विद्यालय चे मुख्याध्यापक एस. बी. पाळेकर, डी एम. डाके, बी. एस.वाघमारे,आर.एम. वट्टमवार, एस. आर. तावडे, जी.डी. धडेवार, भूषण नरवाडे, पी.व्ही. मुधोळ, राठोड सर, रामलु सर, चंद्रकांत गुंडेवाड, येरेवाड मॅडम, गोवंदे मॅडम यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.


























