सोलापूर – वन विभागाचे रेस्क्युअर प्रवीण जेऊरे यांनी दी. २६ डिसेंबर 2026 WCAS चे अध्यक्ष अजित चौहान यांना वसंत विहार येथील रहिवासी होमिओपॅथीक डॉ. गौरी बचल यांच्या घरात पक्षी रेस्क्यू करण्यासाठी संपर्क साधला.
चौहान हे त्या ठिकाणी पोहोचले असता त्यांना सनबर्ड या पक्ष्याची दोन पिल्ले घरट्यातून खाली पडून त्यांच्या पायात एक धागा अडकून ती एकमेकांत गुरफटली असल्याचे दिसून आले. त्यांनी त्या पिल्लांना सोडवून सुरक्षितरित्या परत घरट्यामध्ये ठेवून दिले.
थोड्या वेळातच त्या पिल्लांची आई तिथे आली आणि त्यांना खाद्य भरवू लागली, हे दृश्य पाहून डॉ. बचल यांनी याबद्दल संस्थेचे आभार मानले.

























