जालना – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर युवक जिल्हाध्यक्षपदी प्रविण बबनराव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची ही नियुक्ती माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद अण्णा चव्हाण यांनी केली आहे. यावेळी प्रविण शिंदे यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
या कार्यक्रमास सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, जिल्हा संघटक तथा आमदार विक्रम काळे, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, युवक प्रदेश सरचिटणीस धैर्यशिल चव्हाण, प्रदेश सरचिटणीस शंकुतला कदम, रविंद्र तौर, विधानसभा अध्यक्ष प्रतापराव शिंदे, तालुकाध्यक्ष संतोष ढेंगळे, उमेश मोहिते,वंदना खांडेभराड, शाह आलमखान, शहर अध्यक्ष शेख महेमुद,कार्याध्यक्ष प्रा. सोपान तेलगड, कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके, अण्णासाहेब चितेकर, भाऊसाहेब गोरे, प्रभाकर घेवंदे, जिल्हाध्यक्ष मंगलाताई पाटील, महिला शहराध्यक्ष रिंकल तायड, युवती जिल्हाध्यक्ष शितल बोराडे, भोकरदनचे तालुकाध्यक्ष सुरेश सपाटे , जिल्हा पदाधिकारी, शहर पदाधिकारी, तालुका अध्यक्ष व शहर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्ष संघटन वाढविण्यासाठी व तळागळात पक्षाचे काम पोहचविण्याचे आदेश सदरील नियुक्तीपत्रकात दिले आहे. प्रविण शिंदे यांच्या शर युवक जिल्हाध्यक्षपदी निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

























