सांगोला – जि.प.प्रा.शाळा, नाझरे (ता.सांगोला) येथे विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी देशभक्तीच्या गीताने रसिक श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतले.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन विजय सरगर, सुयोग नवले, मल्लय्या मठपती, ओंकार देशपांडे, सचिन वाघमारे, रुखया मुलाणी, अशोक पाटील, अमोघसिद्ध कोळी, रविराज शेटे, बंडूमामा आदाटे, शशिकांत पाटील, गणीसो काझी, राजाराम पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गणेशाच्या भक्ती गीताने करून विद्यार्थ्यांनी लावणी, गवळण, शेतकरी गीत, देशभक्तीपर गीत सादर केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक राजाराम कोळी, सर्व शिक्षक, शिक्षिका, शालेय व्यवस्थापन सदस्य यांनी परिश्रम घेतले.

























