अक्कलकोट – नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी यांनी प्रभाग क्रमांक चार मध्ये अचानक मॉर्निंग दौरा करुन प्रत्यक्ष पाहणी केले. यावेळी तात्काळ अडचणी व समस्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकारी यांना आदेश दिल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.
प्रभाग क्रमांक चार मध्ये नगरसेवक अविनाश मडीखांबे निवडून आल्यानंतर त्यांनी या प्रभागातील विविध समस्या व अडचणी सोडवण्यासाठी सपाटा लावल्याने नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी यांनी प्रभाग चार मध्ये अचानक मार्निंग दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केले. या पाहणी नंतर अडचणी व समस्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकारी यांना आदेश दिले. यावेळी नगरसेवक अविनाश मडीखांबे, ऋतुराज राठोड, बबलू कामनुरकर, नन्नू कोरबू ,नावेद डांगे,आरोग्य अधिकारी नितीन शेंडगे आदी नगरसेवक उपस्थित होते.

























