सोलापूर : पु ना आणि गाडगीळ सन्स यांच्या पुढाकाराने सालाबाद प्रमाणे यंदाही चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली. शाळा चित्रकलेचे क्लासेस तसेच हौशी चित्रकार विद्यार्थ्यांनी पु ना गाडगीळ आणि सन्स, डफरीन चौक यातील परिसर गजबजला होता.
झपूर्झा म्युझियम ऑफ आर्ट अँड कल्चर अंतर्गत दरवर्षी घेतली जाणारी ही चित्रकला स्पर्धा झपूर्झा या म्युझियमच्या पुढाकारातून घेतली जाते. पुणे येथे स्थित झपूर्झा ही आर्ट गॅलरी म्युझियम ऑडिटोरियम वेगवेगळे वर्कशॉप आणि इव्हेंट्स या ठिकाणी घेतले जातात .
दरवर्षीप्रमाणे चांदीचे मेडल आणि सर्टिफिकेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले जाते.
सोलापूर मधील विद्यार्थ्यांच्या आठवणीत राहणारी ही स्पर्धा करण्याचा आमचा प्रयत्न असतो, असे जितेंद्र जोशी म्हणाले. वेगवेगळ्या क्षेत्रातील कलाकार मंडळींसाठी पु ना आणि गाडगीळ सन्स, डफरीन चौक येथे आर्ट गॅलरी विना शुल्क उपलब्ध केली. यातूनच वेगवेगळे कलाकार आपले कलाकृती प्रदर्शित करू शकतात आणि विक्रीही करू शकतात यासाठी सोलापूर शाखेत संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.

























