करकंब :- महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने शिक्षक,अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने तालुका, जिल्हा,विभागीय आणि राज्यस्तरावर विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.त्यामध्ये वाद्य वादन (पखवाज)स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळोली ता. पंढरपूर व करकंब गावचे सुपुत्र शिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी पुणे, सोलापूर,अहिल्यानगर या तीन जिल्ह्यातील एकूण ३९ स्पर्धकांमधून विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याने त्यांची महाराष्ट्र राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.त्यांची ही निवड पंढरपूर तालुका व सोलापूर जिल्ह्यासाठी भुषणावह आहे.परीक्षक म्हणून जयराम जोशी,विलास क्षीरसागर यांनी काम पाहिले
.पुढील स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा शिक्षणाधिकारी कादर शेख, गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे, केंद्रप्रमुख पा.वा.जाधव, जळोली, करकंब ग्रामस्थ,पदाधिकारी,शिक्षक, शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


























