सोलापूर : सिंहगड पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, केगाव ता. उत्तर सोलापूर येथे ‘उडान 2K25’ या संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन बुधवारी २४ डिसेंबर रोजी अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाले.
विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणे, त्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देत आत्मविश्वासाने भविष्याकडे झेप घेण्याची संधी देणे, हा या स्नेहसंमेलनाचा मुख्य उद्देश होता. शैक्षणिक, क्रीडा व सहशालेय उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे गौहर हसन पोलीस उपायुक्त, सोलापूर शहर पोलीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी कॅम्पस डायरेक्टर संजय नवले सर अध्यक्षस्थानी होते. आपल्या प्रेरणादायी मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस ठेवावे, कठोर परिश्रम, शिस्त व मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या बळावर जीवनात यशस्वी ‘उडान’ घ्यावी, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला पब्लिक स्कूलचे प्राचार्य शाहीन शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, डॉ. एस. एच. पवार, प्राचार्या चेताली मराठे, उपप्राचार्य प्रकाश नवले यांच्यासह अनेक मान्यवर, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिमुकल्यांबरोबर पालकही सहभागी
पापा मेरे पापा, ऐ तो सच है की भगवान
मा ओ मेरी माँ , मेरा लाडला या गीतनृत्यामध्ये चिमुकल्या बरोबर आई वडिलांनीही नृत्यात भाग घेऊन साथ चिमुकल्यांना साथ दिली. यावर्षी हा अनोखा प्रयोग करण्यात आला होता. हा क्षण टिपण्यासाठी अनेकांचे मोबाईल कॅमेरे सरसावले. पालक–विद्यार्थी संयुक्त नृत्याने स्नेहसंमेलन संस्मरणीय ठरले.


























