साेलापूर : साेलापूर गुजराती मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष व ट्रस्टी स्व. महेंद्रभाई लक्ष्मीचंद शाह यांच्या स्मरणार्थ गत सात वर्षापासून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील नामांकित गुजराती व्यक्तिंना पुरस्कार देण्याची सुरुवात करण्यात आली. पहिला पुरस्कार जन्मभुमीचे दैनिकाचे संपादक श्री कुन्दनभाई व्यास , दुसरा पुरस्कार मुंबईचे समाजसेवी हरखचंदभाई सावला , तिसरा नाशिक स्थित सामाजिक व शैक्षणिक कार्यकर्त्या साै. अंजनाबेन जाेषी, चाैथा मुंबईचे साहित्यक श्री प्रविणभाई साेळंकी , पाचवा यवतमाळचे डाॅ. अनिलभाई पटेल, सहावा प्रसिध्द वैज्ञानिक डाॅ. जे. जे. रावळ (मुंबई) , सातवा अभिनेत्री पद्रमश्री सरिता जाेशी ,आठवा पुण्याचे प्रसिध्द समाजसेवक राजेश शाह,नववा मुंबईचे नामवंत पत्रकार साैरभ शाह यांना तर यावर्षीचा पुरस्कार साेलापूरचे समाजसेवक दिव्यकांत गांधी यांना जाहीर करण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष श्री मुकेशभाई मेहता यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती सचिव श्री. जयेश पटेल यांनी दिली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन अल्पसंख्यांक आयाेगाचे अध्यक्ष ललीत गांधी हे भूषविणार आहेत. हा पुरस्कार वितरण कार्यक्रम रविवार दि. 4 जानेवारी 2026 राेजी सायं. 5.30 वा. गुजरात भवनच्या वातानुकुलीत हाॅलमध्ये हाेणार आहे.
स्व. महेंद्रभाई शाह यांच्याविषयी-
स्व. महेंद्रभाई शाह यांनी गुजराती समाज उत्कर्षासाठी अथक परिश्रम घेतले हाेते. त्यांच्या कार्यकाळात मंडळाने सुवर्ण महाेत्सव साजरा केला हाेता. ते सुमारे 55 वर्षे या मंडळाच्या कार्यकारिणी सभासद , अध्यक्ष व ट्रस्टी अशा विविध पदावर कार्यरत हाेत. त्यांनी समाजासाठी दिलेले याेगदान हे प्रशंसनिय असून त्यांच्या स्मृतीसाठी हा गाैरव पुरस्कार देण्याचा उपक्रम गुजराती मित्र मंडळाने त्यांचे सुपत्र केतनभाई व काैशिकभाई शाह यांच्या सहकार्याने सुरु केला आहे. गुजराती समाजासह राेटरी, दमाणी अंधशाळा, राेटरी मुकबधीर शाळा, चेंबर ऑफ काॅमर्स,ऑईल मिल ओनर्स असाेसिएशन, जैन साेश्यल ग्रुप आदी अनेक संस्थेंच्या उत्कर्षात त्यांचा सिंहाचा वाटा हाेता.
पुरस्कार विजेते दिव्यकांत गांधी यांच्याविषयी-
साेलापूरात स्केटींग क्रिडा प्रकारासाठी ह्यांचे नांव प्रामुख्याने घेतले जाते. स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताकदिन निमित्त शाेभायात्राद्वारा राष्ट्रीय एकात्मेचे सूत्र प्रसारणाचे कार्य गेली अनेक वर्षांपासून अविरत करीत आहे. गॅरेज मेकॅनिक, बाग काम करणारे, ड्रायव्हर अशा श्रमजीवी जणांचे ग्रुप बनवून त्यांच्या मदतीने चहा, काॅी, मसाला दूध पेशंटला पुरविणे कार्यासह सिव्हील रुग्णालय येथे सदभावना केंद्रार्माफत झुणका भाकर केंद्र गेली अनेक वर्षे सुरु आहे. ते लिम्का बुक ऑफ रेकाॅर्ड महाराष्ट्राचे पंच म्हणून कार्य करीत आहेत. त्यांनी अनेक पुस्कार मिळाले आहेत ज्यामध्ये प्रामुख्यानेभारतीय उद्याेग रत्न पुरस्कार, नवी दिल्ली, नॅशनल इंडस्ट्रीयल एक्सलेन्स पुरस्कार आदींचया समावेश आहे.
त्यांच्या या अलाैकिक कार्याचा गाैरव म्हणून हा पुरस्कार मंडळाने त्यांना जाहीर केल्याचे सांगण्यात आले आहे.


























