सोलापूर – महानगरपालिका भाजप पक्षासाठी डोकेदुखीचा विषय ठरताना दिसत आहे. सत्तेच्या लालसेपोटी भाजपाने आयात उमेदवारांची घाऊक इनकमिंग सुरू केल्याने, पक्षात कार्यरत असलेल्या निष्ठावंत एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर सतरंजी उचलण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत कार्यकर्ते आपल्याच पक्षाला घरचा आहेर देत आहेत. यापूर्वी धुम्मा यांनी आपल्याच पक्षाला धारेवर धरत आत्महत्येचा तिसरा दिला होता त्यानंतर आता बापू गटाचे शितल गायकवाड यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने भाजपची डोकेदुखी वाढत चाललेली आहे.
महापालिका निवडणूक ही भाजप पक्षातील कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची असते. नेत्याच्या विजयासाठी धडपडलेले कार्यकर्ते महापालिकेच्या निवडणुकीसाठी वाट पाहत असतात. पक्ष सर्वोपरीमानून पाय झीजवलेले असतात. मात्र त्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला वनवास येत असल्याचे लक्षात आल्यानंतर दोन्ही देशमुख यांनी बंड पुकारले. पालकमंत्र्यांनी दोन आमदारांचे बंड शमावले. परंतु कार्यकर्त्यांच्या इशारा वाजा धमक्या थांबवण्याच्या नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे.
दिला आत्मदहनाचा इशारा
प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी समोर येत कार्यकर्त्यांनी आपली खदखद व्यक्त करताना खुद्द आमदार बापूंनी आम्हाला चार चौघात उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. आता आयात उमेदवार प्रभागात दाखल होत असल्याने आम्ही पक्षात निष्ठावांत राहून काय करायचे असा प्रश्न उपस्थित करत आहेत. आम्हाला उमेदवारी न मिळाल्यास भाजप पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करू असा सज्जड इशारा शितल गायकवाड यांनी दिला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी, पालकत्व स्वीकारलेले आमदार तसेच पदाधिकारी मंडळी यांची डोकेदुखी वाढलेली आहे.
आम्ही काय सतरंज्या उचलायचे का
पक्षांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही एकनिष्ठने काम करत आहे. अचानक बाहेरून आलेले उमेदवार उमेदवारी घेत आहेत. आम्ही केवळ सतरंज्या उचलायचे का ? एकनिष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना हेच फळ देणार आहेत का असा प्रश्न स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
संपूर्ण प्रभाग पिंजून काढला ; घराघरात भाजप पोचवला
प्रभाग क्रमांक २२ मध्ये लोकसंख्या सुमारे ४२ हजार इतकी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागात लोकहिताचे कामे करत आहेत. संपूर्ण प्रभाग पिंजून काढला आहे. उमेदवार आयात केल्याने सर्वत्र संभ्रमावस्था आहे. पक्षाने उमेदवारी बाबत लवकर भूमिका जाहीर करावी असेही ते म्हणाले


























