टेंभुर्णी – येथे दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन खुळे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. याच वेळी संभाजी ब्रिगेड माढा, माळशिरस व करमाळा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली. ही बैठक सोलापूर जिल्ह्यातील राजकारण व समाजकारणाला नवी दिशा देणारी ठरली.
या कार्यक्रमास संभाजी ब्रिगेडचे राज्य कार्यकारिणी सदस्य दिनेशजी जगदाळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन जगताप, जिल्हाध्यक्ष (माढा विभाग) सचिन खुळे, जिल्हा सचिव गणेश सव्वाशे, जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ, जिल्हा संघटक सतीश चांदगुडे उपस्थित होते.
तसेच तालुकाध्यक्ष (माळशिरस) दिगंबर मिसाळ, तालुकाध्यक्ष (करमाळा) अमितजी घोगरे, तालुका उपाध्यक्ष (माळशिरस) सचिन पराडे, तालुका कार्याध्यक्ष (करमाळा) राजेश ननवरे, तालुका कार्याध्यक्ष (माढा) बाळासाहेब वागज, तालुका संघटक (माळशिरस) राजेश पवार, तालुका कार्याध्यक्ष (माळशिरस) शरद लिंगाडे, तालुका संघटक (करमाळा) मयूर सावंत, तालुका अध्यक्ष कामगार आघाडी (माढा) अजय गायकवाड, तालुकाध्यक्ष विद्यार्थी आघाडी (माढा) शंकर नागणे, तालुका उपाध्यक्ष विद्यार्थी आघाडी (माढा) किरण जाधव, माजी तालुकाध्यक्ष मराठा सेवा संघ अतुल वारे पाटील, शहराध्यक्ष टेंभुर्णी योगेश मुळे, संजय देशमुख, विजय काळे (मराठा सेवा संघ), युवा नेते अश्विन पाटील, तसेच विशाल पाटील, विकास शेळके व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना राज्य कार्यकारिणी सदस्य दिनेश जगदाळे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. समाजाप्रती असलेले प्रेम, बांधिलकी व सकारात्मक भूमिका जपत राजकारणात नवे अस्तित्व निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन जगताप यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात होणाऱ्या राजकीय निवडणुका तसेच सामाजिक कार्यामध्ये संभाजी ब्रिगेड आपली वेगळी व ठळक ओळख निर्माण करेल.
सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन खुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर येणाऱ्या काळात संपूर्ण ताकद व जिद्दीने संभाजी ब्रिगेडची पक्षबांधणी केली जाईल. शाहू–फुले–आंबेडकर यांच्या विचारांची चळवळ जिल्ह्यात प्रभावीपणे पुढे नेऊन संभाजी ब्रिगेडची ऐतिहासिक ओळख निर्माण करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला


























