सोलापूर – दिवसेंदिवस शेतीचा रस्ता अडविण्याच्या प्रकारात वाढ होत आहेत. त्यामुळे पोलीस व महसूल विभागामधील तक्रारी वाढत आहेत. ऊस तोडणी झाल्यानंतर ऊस वाहतूक करणारी रस्ता बंद करून वाहने अडविल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ होत आहे. ऊसाचे वजन घटल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे. मंद्रूप अप्पर तहसील कार्यालयात शेकडो शेतकर्यांनी रस्ता मागणीसाठी अर्ज केला असल्याने नूतन तहसीलदार विष्णू बोटे यांनी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या रस्ता अडविल्यास त्या शेतकऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय तहसीलदार बुटे यांनी घेतला आहे . त्यामुळे ऊस तोडणी झाल्यानंतर वाहने अडविणाऱ्या शेतकऱ्यांवर वचक बसणार आहे. शिवाय शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी रस्ता मिळणार आहे.
मंद्रूपचे नूतन तहसीलदार विष्णु बुटे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय घेतला आहे . शेतात ऊस वाहतूक करणारी वाहने अडविल्यास त्यांच्यावर फौजदारी करण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे. यामुळे शेतकरी सामंजस्यातून वाद मिटवून घेतील. प्रशासन व शेतकर्यांचा वेळ वाया जाणार नाही.
भीमाशंकर बबलेश्वर, सरपंच , भंडारकवठे
..,
शेतकर्यांचे त्रास कमी करणार
..
शेतकर्यांमधील वादामुळे शेती रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव प्रलंबित आहेत. यामुळे शेतकरी व प्रशासनाचेही वेळ वाया जात आहे . शेतकऱ्यांमध्ये समन्वय साधून रस्त्याचा प्रश्न सोडवणार आहे. ऊस तोडणी झाल्यानंतर रस्ता बंद करून वाहने अडविल्यास संबंधित शेतकऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे .
विष्णू बुटे, तहसीलदार , अप्पर तहसील , मंद्रूप
















