सोलापूर : जगभरात सर्वत्र नववर्ष प्रारंभानिमित्त शुभेच्छांचं अदान-प्रदान होत असताना, 01 जानेवारी रोजी भिमा-कोरेगांव येथील शौर्याचं स्मरण करून विजयस्तंभासमोर नतमस्तक होण्यासाठी एकत्र आलेल्या बांधवांच्या साक्षीनं नियोजित शाक्य संघ सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी महाराष्ट्र राज्य यांनी विशेष ड्रेस कोडमध्ये वाद्य पथकासोबत पथसंचलन करुन शौर्य विजय स्तंभास मानवंदना दिली.
शाक्य संघ महाराष्ट्र व यशसिध्दी आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य, शाक्य संघ सोलापूर, शाक्य संघ प्रज्ञासुर्य अमरावती, शाक्य संघ मिलिंद दौंड, नियोजित शाक्य संघ शौर्य विजयस्तंभ, पुणे, शाक्य संघ सुभेदार रामजी आंबेडकर, नांदेड, नियोजित शाक्य संघ सम्राट अशोका, बीड, नियोजित शाक्य संघ माता रमाई महिला ब्रिगेड महाराष्ट्र राज्य, नियोजित शाक्य संघ, बोधीसत्व, ठाणे येथील बौध्द उपासक व बौध्द उपासिका या मानवंदनेस मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
त्यांच्या, शौर्य विजयस्तंभाचा विजय असो, 500 शूर महारांचा विजय असो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, राजर्षी छत्रपती शाहुजी महाराज यांचा विजय असो, अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
याप्रसंगी आयु. महेशगौरी यांना समाज भुषण पुरस्कार, आयु. अशोककुमार दिलपाक (शाक्य संघ नेतृत्व पुरस्कार), आयु. राहुल आढाव यांना भूदान पुरस्कार व सर्वांना पंचशिल उपरणे व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना खालील पुरस्कार सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या अविस्मरणीय सोहळ्याचं सूत्रसंचालन डॉ. किर्तीपाल गायकवाड (सोलापूर) यांनी केले तर अशोककुमार दिलपाक यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.






















