टेंभुर्णी – मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त ०६ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या औचित्याने शिवसेनेचे माढा लोकसभा प्रमुख संजय कोकाटे यांच्या वतीने टेंभुर्णी व परिसरातील पत्रकार बांधवांचा सन्मान समारंभ टेंभुर्णी येथे आयोजित करण्यात आला होता.
या समारंभात टेंभुर्णी प्रेस क्लब तसेच टेंभुर्णी परिसरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये टेंभुर्णी प्रेस क्लबचे अध्यक्ष सतीश चांदगुडे, उपाध्यक्ष विष्णू बिचकुले, सचिव राजेंद्र केदार, खजिनदार अनिल जगताप, ज्येष्ठ पत्रकार डी. एस. गायकवाड, सदाशिव पवार, सुहास साळुंखे, सोपान ढगे, संतोष पाटील, गणेश चौगुले, धनंजय मोरे, सतीश काळे, सचिन होदाडे, सुरज देशमुख, श्रीकांत मासुळे, महावीर वजाळे व नाथा सावंत यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास विनोद पाटील, विशाल गायकवाड, तुकाराम पाटील, रामभाऊ गोरे यांच्यासह विविध पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात प्रबोधन, पारदर्शकता व लोकशाही मूल्ये जपण्याचे महत्त्व अधोरेखित करत पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्याचा सकारात्मक संदेश या सन्मान समारंभातून देण्यात आला.


















