सोलापूर – भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कोषाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा वाढदिवस विविध लोकउपयोगी व सामाजिक उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला. यावेळी सर्वप्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांना वह्या तसेच खाऊ वाटप करण्यात आले. त्यानंतर मार्डी येथील सार्वजनिक ठिकाणी, धार्मिक ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी बाकडे भेट देण्यात आले. शेतकरी गटांना शेती उपयोगी साहित्य व अवजारे यांचे वाटप करण्यात आले. सरपंच क्रिकेट लीग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले.
या स्पर्धेमध्ये जीपी वॉरियर्स क्रिकेट संघाने प्रथम पारितोषिक पटकावले, घातक क्रिकेट संघ दुसरा तर एसराजे क्रिकेट संघाने तृतीय क्रमांक बक्षीस मिळविले. सोलापूर येथील महिला भगिनींनी इंद्रजीत पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची धान्याची तुला करून जमा झालेले सर्व धान्य सोलापुरातील श्री स्वामी समर्थ समाजसेवी न्यासला देण्यात आले. बाणेगाव येथे भाजपा ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष केदार तोडकरी यांच्याकडून इंद्रजीत पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हळदी कुंकू समारंभ आणि महिलांसाठी साडीवाटप कार्यक्रम घेण्यात आला. पत्रकार दिनानिमित्त उत्तर सोलापूर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अविनाश मार्तंडे, सोसायटी चेअरमन बाबासाहेब पाटील ज्येष्ठ नेते शिवाजी सोनार, काशिनाथ कदम, भाजपा तालुका अध्यक्ष संभाजी दडे ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विनायक सुतार, किसान मोर्चा अध्यक्ष नागेश ननवरे, गणेश पवार बाणेगावचे सरपंच पिंटू जाधव, कारंबा गावचे सरपंच तुकाराम चव्हाण, दीपक डांगे, गुळवंचीचे सरपंच सुनील जाधव नरोटेवाडीचे सरपंच उमेश भगत, कमलाकर माने , दत्तात्रय पवार, अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष अझरभाई शेख, उत्तर युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल सुतार, महेश पेंडपाले, युवराज पवार, महादेव जाधव, विश्वनाथ जगताप, तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मल्हारी काळे, मनगीन भालेकर, कदिर कुडले ,श्रीकांत वैदकर, रंगनाथ गुरव, संजय इनामदार, प्रभाकर फुलसागर, कुमार भिंगारे, प्रवीण लबडे, बाबुराव भोरे, श्रीकांत पाटील, पिंटू कापसे, लिंबाजी जाधव, सुहास भोसले, नागेश ननवरे, दीपक डांगे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सरोजनी जगताप तसेच उत्तर सोलापूर मधील भाजपा पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी – भाजपचे जिल्हा कोषाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यतुला करण्यात आली.त्याप्रसंगी छायाचित्रात सुनील पवार,माजी सभापती संध्याराणी इंद्रजित पवार, सरपंच प्रांजली गणेश पवार आदी


















