जेऊर – करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत व पंचायत समिती मार्फत दिव्यांग बांधव यांना 5 % टक्के सन 2024-25 चा निधी वाटप करण्यात यावा यासाठी पंचायत समिती गट विकास अधिकारी करमाळा डॉ,अमित कदम यांना निवेदन देण्यात आले. करमाळा तालुक्यातील सर्व गावातील ग्रामपंचायत मार्फत दिव्यांग 5 % टक्के निधी वाटप गट वर्ष 2024-25 चा वाटप करण्यात आलेले नाही.
तरी सदर निधी 26 जानेवारी दिवशी प्रत्येक ग्रामपंचायत माध्यमातून दिव्यांग बांधवांचा प्रमाणपत्र देऊन मानसन्मान करावा व ५% निधी वाटप करण्यात यावा, अशी सूचना सर्व गावातील ग्रामसेवक यांना करून दिव्यांग बांधव यांना न्याय मिळवून द्यावा काही गावातील ग्रामसेवक आपल्या गावातील महसूल इतर दिव्यांग ठिकाणी खर्च झाला म्हणून दिव्यांग बांधवांना खोटी माहिती दिली जात आहे. व दिव्यांग बांधवांना थोड्या प्रमाणामध्ये निधी वाटप केला जातो व काही दिव्यांग बांधवांना गावातील ग्रामपंचायत मध्ये दिव्यांग निधी वाटप करत नाहीत. आणि गावातील तक्रारी प्रहार संघटने कडे आहेत यामुळे तालुक्यातील गावातील राजकारणाच्या प्रतिनिधीला व राजकारण करणाऱ्या लोकांना पाठीशी घालणाऱ्या अशा गावातील ग्रामपंचायती मधील ग्रामसेवक, सरपंच, यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी .अन्यथा प्रहार स्टाईलने अशा ग्रामसेवकाच्या तोंडाला काळे फासून आंदोलन करण्यात येईल.असे निवेदन करमाळा गट विकास अधिकारी डॉ,अमित कदम साहेब यांना देण्यात आले.
यावेळी प्रहार करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, प्रहार तालुका उपाध्यक्ष पप्पू ढवळे, दिव्यांग संघटना अध्यक्ष बिभीषण काळे, सामाजिक नेते, मानसिंग खंडागळे, व इतर सर्व दिव्यांग बांधव प्रहार पदाधिकारी,कार्यकर्ते, उपस्थित होते,

















