मुंबईमध्ये आणखी एक ब्रिटिशकालीन पूल आता जमीनदोस्त होणार आहे. मुंबईमध्ये 1868 सालीचा कर्नाक लोखंडी ब्रीज आज पूर्णपणे तोडला जाणार आहे. यासाठी विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. लोकल आणि लांब पल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे.
सीएसएमटी ते मस्जिद बंदर स्थानकातील कर्नाक पूल अखेर पाडकाम सुरू झाले आहे. शनिवारी रात्रीच या कामाला सुरुवात झाली आहे. पुलावरील सर्व सिमेंट आणि डांबर हटवण्यात आले आहे. पुलाला 4 तुकड्यात कटिंग करण्यात येणार आहे. इंग्रज काळातील 154 वर्षापेक्षा जुना कर्नाक पुलाला तोडण्यासाठी रेल्वे विभागाने 27 तासाचा मेगाब्लॉक केला आहे.
हा मेगाब्लॉक सीएसएमटीकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर असणार आहे. ब्रीज तोडण्यासाठी मोठया विशालकाय क्रेन आणि oxigen आणि LPG सिलेंडरच्या सहाय्याने कटिंग केला जाणार आहे. सीएसएमटी ते मस्जिद बंदर रेल्वे स्थानकादरम्यान कर्नाक पूल हा १९६८ मध्ये उभारण्यात आला होता. 154 वर्ष झाल्यामुळे हा पूल धोकादायक ठरवण्यात आला होता.
दरम्यान, मध्य रेल्वे मुंबई विभाग 19 आणि 20 नोव्हेंबर या दोन दिवशी अप आणि डाउन धिम्या मार्गावर, अप आणि डाउन जलद मार्गांवर तसेच अप आणि डाउन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मस्जिद स्टेशन दरम्यान किमी 0/1-2 येथे रोड क्रेन वापरून कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे.