वेळापूर – इंग्लिश स्कूल वेळापूर व सुवर्ण संकल्प स्पोर्ट्स शूटिंग क्लबचा विद्यार्थी श्रीकृष्ण ज्योति बापू मेटकरी याने वेळापूरची परंपरा कायम ठेवत त्याने भोपाळ (मध्य प्रदेश) येथे सुरू असणाऱ्या शालेय नॅशनल रायफल शूटिंग स्पर्धेत आपल्या जिद्द, चिकाटी, च्या जोरावर आपल्या खेळाचे सर्वोत्तम प्रदर्शन करीत १४ वर्षा खालील मुले या गटात १० मी ओपेन साइड रायफल प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत संघाला सिल्वर मेडल मिळवून दिले.
त्याने आपल्या कुटुंबाचे शाळेचे आणि महाराष्ट्राचे नाव संपूर्ण देशभरात गाजवले आहे. त्याला त्याच्या या यशाबद्दल राष्ट्रीय प्रशिक्षक अक्षय राऊत, व सतीश कदम यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्बल त्याचे आमदार उत्तमराव जानकर, माजी जि प सदस्य सतीशराव माने देशमुख, वेळापूर सरपंच रजनीश बनसोडे, माजी उपसरपंच शंकरराव काकूळे, माजी उपसरपंच जावेद मुलाणी, अॅड. दत्तात्रय राऊत, भागवत गायकवाड,
संस्थेचे अध्यक्ष अॅड. सुजित कदम, उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम , संस्थेच्या संचालिका डॉ. सौ मीनाक्षी कदम, सचिवा डॉ. सौ. प्रियदर्शनी महाडिक, संचालिका सौ. तेजस्विनी कदम, शाळा समिती चेअरमन प्रतापराव पाटील, प्राचार्य आर बी पवार , उपमुख्याध्यापक
पठान शिवशरण , पर्यवेक्षक सावळे बी एस , शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष अमोल मंडलिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप जगदाळे, उपाध्यक्ष प्रियंका पोरे, संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, माजी खेळाडू, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

















