सोलापूर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मतदान प्रक्रिया प्रशिक्षण आज हुतात्मा स्मृती मंदिर व द हेरिटेज मंगल कार्यालय येथे यशस्वीरीत्या पार पडले.
आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी मार्गदर्शन करताना मतदान प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.
यावेळी उपायुक्त आशिष लोकरे, निवडणूक अधिकारी अंजली मुरोड, अभिषेक देशमुख, रजाक पेंढारी यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रशिक्षणात मतदान केंद्र उभारणी, कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, मतदार ओळख तपासणी, ईव्हीएम वापर, मॉक पोल, नियमावली व आकस्मिक परिस्थितीतील खबरदारी याबाबत माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत राबविण्यास मदत होणार असून निवडणुका मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
















