सोलापूर – श्री मल्लिकार्जुन हायस्कूल,हत्तुरे नगर,सोलापूर येथे SC- 8437 भारतीय मानक ब्युरो BIS पुणे विभाग यांच्या वतीने दिनांक – 08/01/2026 रोजी LSVS लर्निंग सायन्स वाया स्टॅंडर्ड या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यशाळेत BIS क्लबचे KEY Resource Person म्हणून तेजश्री देवरे मॅडम उपस्थित होत्या. BIS Mentor प्रिया पसारे यांनी शाळेत BIS अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सर्व ऍक्टिव्हिटी ची माहिती दिली.प्रशालेचे जेष्ठ शिक्षिका अनिता हौदे यांनी शाल व ग्रंथ देऊन तेजश्री देवरे मॅडम यांचा सत्कार केला.
यानंतर तेजश्री देवरे मॅडम यांनी प्लायवुड आणि इलेक्ट्रॉनिक weighing machine या साधनांमध्ये वापरण्यात येणारे scientific rules,testing method यांची माहिती slides आणि व्हिडिओद्वारे दिली.हॉलमार्किंग,standard watch,लर्निंग सायन्स वाया स्टॅंडर्ड याचा उपयोग अभ्यासक्रमात कसा करता येईल याबद्दल माहिती दिली.अतिशय उपयुक्त अशा प्रकारची एक दिवसीय कार्यशाळा विद्यालयात संपन्न झाली.BIS चे विज्ञान शिक्षिका प्रिया पसारे यांनी सर्वांचे आभार मानले.
या कार्यशाळेसाठी प्रशालेचे प्र.मुख्याध्यापक रमेश दिंडोरे,अनिलकुमार गावडे,प्रिया पसारे,प्रतीक्षा बिडवे यांची विशेष उपस्थिती होती.

















