लासूर स्टेशन – (ता. गंगापूर) येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थानिक शाखेची सन 2026 साठी नवीन कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली. या निवड बैठकीची सुरुवात अंनिस चळवळीच्या प्रेरणादायी गीताने करण्यात आली.
बैठकीचे प्रास्ताविक भास्कर गोपीनाथ बनसोडे यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मच्छिंद्र तुकाराम पानकर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन मच्छिंद्र कारभारी बडोगे यांनी केले.
या वेळी अध्यक्षपदी किशोर बाबुराव पवार यांची तर उपाध्यक्षपदी मच्छिंद्र तुकाराम पानकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे —
कार्याध्यक्ष : भास्कर गोपीनाथ बनसोडे
प्रधान सचिव : जगजीवन सातदिवे
पर्यावरण विभाग कार्यवाह : प्रशांत एकनाथ दाभाडे
सांस्कृतिक कार्यवाह : मच्छिंद्र कारभारी बडोगे
वैज्ञानिक जाणिवा कार्यवाह : गोविंद बाबुराव हिवाळे
बुवाबाजी संघर्ष कार्यवाह : जावेद चांदभाई मन्सुरी
जोविनी कार्यवाह : ज्ञानेश्वर भानुदास वाघचौरे
याशिवाय सदस्य म्हणून डॉ. विकास संगेकर, गौतम घनश्याम गवई, प्रकाश वामनराव सोनवणे, साईनाथ मोरे, महेश क्षीरसागर, मारुती गोलांडे आदींची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसार, सामाजिक प्रबोधन व युवकांमध्ये विवेकवादी विचार रुजवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


























