पिलीव – माळशिरस तालुक्यात सध्या भाजपमध्ये प्रवेशाची अक्षरश रिघ लागली आहे.माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या विकासकामांच्या जोरावर विविध गावचे पदाधिकारी ,कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत.
7 जानेवारी रोजी चांदापुरी गावचे विद्यमान उपसरपंच हनुमंत सरतापे ,ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब चोरमले, रामदास निकम, संतोष सरक तसेच प्रमुख कार्यकर्ते दिलीप सरक,प्रताप सुळ, मंगेश कोपनर, कमलेश कोपनर, नवनाथ कोपनर, तानाजी जगदाळे, विष्णु चोरमले यांनी आज माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी माळशिरस तालुका मंडल अध्यक्ष नितीन मोहिते, माजी जिल्ह्य परिषद सदस्य गणेश पाटील, चंद्रकांत जाधव, प्रमोद भैस, शिवराज पुकळे ,भाजपा अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष शाहीद शेख , यांच्यासह चांदापुरी ,पिलीव व आसपासच्या परिसरातील अनेक मान्यवर यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रवेशानंतर चांदापुरीचे विद्यमान उपसरपंच हनुमंत सरतापे यांनी माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार व माढयाचे खासदार यांना आम्ही विधानसभा व लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे मदत केली माञ त्यांनी कोणतीही विकास कामे किंवा अडी अडचणी ना ऐकुन घेतल्या ना सोडविल्या यामुळे आम्ही माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या विकास कामांना प्रेरीत होऊन भाजपमध्ये प्रवेश केला .
चांदापुरी गावचे विद्यमान उपसरपंच हनुमंत सरतापे व तिन विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे मोहिते पाटील व जानकर गटाला चांदापुरी गावात खिंडार पडले आहे ._ शाहीद शेख.,अल्पसंख्यांक अध्यक्ष माळशिरस तालुका.
चांदापुरी येथील विद्यमान उपसरपंच हनुमंत सरतापे व इतर मान्यवर यांचा माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश.

















