जेऊर – करमाळ्यात ‘ब्लड इन निड’ या उपक्रमांतर्गत जीवनदान महाकुंभ – 2026 अंतर्गत महा रक्तदान शिबिराचे आयोजन शुक्रवार, 9 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत करण्यात आले आहे, अशी माहिती करमाळा तालुका सेवा समितीचे अध्यक्ष संतोष हंडाळ यांनी दिली. हे शिबिर अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी यांच्या कृपाशीर्वादाने तसेच उत्तराधिकारी प. पु. कानिफनाथ महाराज यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात येत आहे.
शिबिराचे ठिकाण दत्त मंदिर, कॉटेजच्या समोर, एस. टी. स्टँड शेजारी, करमाळा (ता. करमाळा, जि. सोलापूर) असे आहे.
रक्ताची वाढती गरज लक्षात घेता अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेले रुग्ण तसेच गंभीर आजारांतील रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा व्हावा, या उद्देशाने या महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान ही सामाजिक जबाबदारी असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपस्थित राहणार असून रक्तदात्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेतली जाणार आहे. रक्तदात्यांना प्रमाणपत्र तसेच अल्पोपहार देण्यात येणार आहे. “रक्तदान म्हणजे जीवनदान” या पुण्यकार्यात शहर व तालुक्यातील नागरिक, भाविक, भक्त व शिष्य यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका अध्यक्ष संतोष हंडाळ यांनी केले आहे.
aया उपक्रमाचे आयोजन करमाळा तालुका सेवा समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

















