जेऊर – उमरड (ता. करमाळा) येथील सौ.पल्लवी गणेश मारकड – पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या अंतिम निकालात सहाय्यक राज्यकर आयुक्त , गट – अ (ACST- Class- 1 ) या पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सौ.पल्लवी गणेश मारकड – पाटील सध्या पुणे येथे GST विभागात राज्यकर अधिकारी, गट- ब , या पदावर कार्यरत आहेत. सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी आणि प्रशासकीय सेवेत काम करत असतानाच त्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे.
त्यांच्या यशामध्ये त्यांचे पती श्री. गणेश आनंदराव मारकड – पाटील यांची मोलाची साथ लाभली. श्री. गणेश मारकड पाटील हे सध्या राज्यकर अधिकारी म्हणून पुणे येथे कार्यरत असून त्यांनी अभ्यासाच्या प्रत्येक टप्प्यावर मानसिक, शैक्षणिक व कौटुंबिक पाठबळ दिले.
विशेष म्हणजे, सौ. पल्लवी गणेश मारकड- पाटील यांची ही पहिलीच यशस्वी निवड नसून यापूर्वीही त्यांची विविध परिक्षांमध्ये वर्ग- अ व वर्ग- ब पदी निवड झाली होती. 2021 मध्ये राज्यसेवा परिक्षा मधुन कामगार अधिकारी पदी व 2022 राज्यसेवा परिक्षा मधून गटविकास अधिकारी पदी (BDO) पदी निवड झाली होती.
त्यांची ही सातत्यपूर्ण यशस्वी वाटचाल आजच्या तरुण पिढीसाठी, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी, अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे. या निवडीमुळे उमरड व करमाळा तालुक्याच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात नवे आदर्श निर्माण झाले असून, कुटुंबीय, मित्रपरिवार, मार्गदर्शक व ग्रामस्थांनी समाधान व अभिमान व्यक्त केला आहे.
















