सोलापूर – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने अहमदनगर येथे घेण्यात आलेल्या शिक्षक अधिकारी पोस्टर मेकिंग स्पर्धेत श्री नवलबाई फुलचंद शहा कोठारी प्रशालेतील श्री महेश स्वामी यांनी विभागीय स्तरावर चौथा क्रमांक मिळवून त्यांची राज्यस्तरासाठी निवड झालेली आहे.
राज्यस्तरावरील ही स्पर्धा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी येथे होणार संपन्न आहेत. विभागीय स्तरांवर मिळविलेल्या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. रमेश यादवाड व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , पालकानी कौतुक करून अभिनंदन केले.

















