पुणे – भारतीय मजदूर संघ व नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स शी संलग्न असलेल्या ” बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स ऑर्गनायझेशन”चे २१ वे त्रैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन येत्या शनिवारी दहा जानेवारी रोजी संपन्न होत आहे.
आळंदी येथील फ्रुटवाले धर्मशाळेच्या आर एम डी सभागृहात शनिवारी सायंकाळी पाच वाजता खासदार डॉ मेघा कुलकर्णी यांचे हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून बँक ऑफ महाराष्ट्र चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी निधू सक्सेना,भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस रवींद्र हिंमते,भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय चिटणीस व वित्तीय संस्था प्रभारी गिरीश चंद्र आर्य, बोमोचे संस्थापक बाळासाहेब फडणवीस,नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स चे राष्ट्रीय सरचिटणीस के एन आदर्श ह्यांची मुख्य उपस्थिती राहणार आहे.
अधिवेशनामध्ये सध्याची बँकिंग उद्योगा समोरील आव्हाने,बँक ऑफ महाराष्ट्र मधील अधिकाऱ्यांचे ज्वलंत प्रश्न,राष्ट्रीयकृत बँकांचे होऊ घातलेले विलीनीकरण आदी विषयावर चर्चा होणार असून विविध ठराव पारित केले जाणार आहे.
अधिवेशन यशस्वितेसाठी विविध समित्या स्थापित केल्या असून “बोमो” चे अध्यक्ष मनीष जैन,चेअरमन डॉ सुनील देशपांडे, एम व्ही सुमित्रानंदन,कार्याध्यक्ष अश्विनी देव हे प्रयत्नशील आहेत.
ह्या अधिवेशनास संपूर्ण भारतातून म्हणजे दिल्ली,चेन्नई,उत्तर प्रदेश,केरळ,तामिळनाडू,पश्चिम बंगाल,मध्यप्रदेश,आंध्र,गुजराथ,ओरिसा गोवा ,बिहार,आसाम,कर्नाटक,झारखंड,तेलंगणा,पंजाब,हरियाणा,हिमाचल प्रदेश,जम्मू काश्मीर या राज्यासह महाराष्ट्र राज्यातील “बँक ऑफ महाराष्ट्र”चे सुमारे पंधराशे चे वर अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे “बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स ऑर्गनायझेशन”चे राष्ट्रीय सरचिटणीस संतोष गदादे यांनी माहिती दिली आहे.

















