सांगोला – राष्ट्रीय व राज्य तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने सोलापूरचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश एम.एस.शर्मा यांचे मार्गदर्शनाखाली तसेच सचिव पी.पी.पेठकर यांचे सहकार्याने सांगोला तालुका विधी सेवा समिती व विधिज्ञ संघ, सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवक दिनाचे औचीत्य साधून दिवाणी न्यायालय, सांगोला येथे विशेष कायदेविषयक शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचे अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश पी.आर.कुलकर्णी व सह.दिवाणी न्यायाधीश ए.ए.पाटील, २ रे सह.दिवाणी न्यायाधीश एस.एस.साळुंखे, सांगोला विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड.एम.एन.ढाळे, महीला प्रतिनीधी ॲड.एस.व्ही.बोत्रे, सुभव प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष भारत शेळके उपस्थित होते.
या कायदेविषयक शिबीराचा मुख्य उद्देश युवकांना मार्गदर्शन करणे हा होता. या विषयावर सांगोला विधीज्ञ संघाचे विधीज्ञ ॲड.जी.एल.भाकरे यांनी आपले मार्गदर्शनपर भाषणात अनेक उदाहरणांचा संदर्भ देताना युवकांनी आपल्या भविष्यकालीन आयुष्यामध्ये यश मिळविणे करीता व्यसनाधिनते पासून दुर राहून जिद्द, चिकाटी व सातत्याने प्रयत्न करणेचे महत्व सुभव प्रबोधिनीचे उपस्थीत सर्व प्रशिक्षणांर्थी, विद्यार्थी यांना समजावून सांगितले. दिवाणी न्यायाधीश पी.आर.कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना भविष्यकाळातील आपले ध्येय आत्तापासूनच निश्चीत करणेचा कानमंत्र दिला. व ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कायम जिद्द, चिकाटी, कष्ट व सातत्य या गोष्टींचा अंगीकार करणे अतिशय महत्वाचे असलेबाबत नमूद केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.एस.व्ही.धनवडे, सूत्रसंचालन ॲड.आर.एन.दौंड यांनी केले. आभार ॲड.डी.एम.माने यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांगोला न्यायालयाचे सहा.अधिक्षक ए.एस.बमनळ्ळी, डी.डी.मायभाटे, विधी सेवा समितीचे वरिष्ठ लिपीक डी.एम.डोईफोडे यांनी परिश्रम घेतले.

















