सोलापूर – महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रचाराला चांगलाच वेग आला असून मतदानास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. प्रभाग क्रमांक २२ मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, सौ. अंबिका नागेश गायकवाड व सौ. चैत्राली शिवराज गायकवाड यांच्या होम टू होम प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे मागील वीस वर्षांत नागेश गायकवाड व किसन जाधव यांनी या प्रभागात रस्ते, पाणी, ड्रेनेज, दिवाबत्ती, समाज मंदिरे व मूलभूत सुविधांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून प्रभागाचा कायापालट केला आहे. ईच्छा भगवंताची परिवाराचे आधारस्तंभ मार्गदर्शक लक्ष्मण मामा जाधव यांच्या समाजसेवेमुळे भाजपच्या चारही उमेदवारांना मोठा जनाधार लाभत आहे.
आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून प्रभाग २२ साठी पुन्हा मोठ्या प्रमाणात निधी मंजूर होणे ही या प्रचाराची महत्त्वाची बाब ठरली आहे. यावेळी किसन जाधव म्हणाले की, दोन नंबर झोपडपट्टी, इरण्णा वस्ती, मोठे इराणा वस्ती, धोंडीबा वस्ती, नगर सनत नगर, मंजुनाथ नगर, लिमयेवाडी सेटलमेंट, यतीम खाना, विजापूर नाका परिसर येथे कष्टकरी कामगारांची मोठी लोकसंख्या आहे.
या सर्वांच्या आरोग्यासाठी रामवाडी प्रशस्तीगृह येथे अद्ययावत उपचार सुविधा, जनजागृती व गरजू रुग्णांना आर्थिक दिलासा देणारी व्यवस्था उभारण्याचा आमचा मानस आहे प्रभाग २२ चा सर्वांगीण विकास आणि कष्टकरी कामगारांचे आरोग्य हेच आमचे प्राधान्य आहे. भाजपाच्या माध्यमातून येथे विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे, असे जाधव यांनी स्पष्ट केले. गाठीभेटीदरम्यान मतदारांना व्हीव्हीपॅडद्वारे मतदानाचे प्रात्यक्षिक दाखवून कमळावरच बटण दाबण्याचे आवाहनही करण्यात आले.
प्रभाग २२ च्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपच्या चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
















