अक्कलकोट – सोलापूर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आश्रमशाळा नागनळळी यांनी उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान लातूर येथे पार पडला. हा सन्मान इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्याचे सचिव . अप्पासाहेब धुळाज यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रदर्शनात यश मिळवलेल्या ओंकार फडतरे, महेश टेंगळे, या विद्यार्थ्यांचा तसेच विज्ञान शिक्षक रवींद्र नवले, अमोल पाटील, वसीम शेख,शंभुलिंग बशेट्टी व नुरुद्दीन शेख या मार्गदर्शक शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला.
मार्गदर्शन करताना धुळाज म्हणाले की, समाजातील वंचित घटकातील मुले आश्रमशाळांमधून शिक्षण घेत असून शासन त्यांना सर्व परिपूर्ण सुविधा पुरवत आहे. या संधीचा योग्य उपयोग करून शाळांनी विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवावे तसेच त्यांच्यामध्ये जीवनकौशल्ये विकसित करावीत, असे त्यांनी आवाहन केले.
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव .. जावेद पटेल, प्राचार्य . मुजावर आय. एम. यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
. चौकट
*
राज्य विज्ञान संस्था, रवी नगर, नागपूर व शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यमिक), जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी), गोपाळपूर, पंढरपूर येथे दिनांक ५ व ६ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आले होते.
या प्रदर्शनात जिल्ह्यातील माध्यमिक गटातून एकूण ३९ वैज्ञानिक उपकरणांची मांडणी करण्यात आली होती.
*प्रथम क्रमांक व राज्यस्तरीय निवड*
के. एस. एम. कनिष्ठ महाविद्यालय, नागनाळळी येथील विद्यार्थी महेश टेंगळे, हरळय्या यशवंत व ओंकार फडतरे यांनी “स्मार्ट ॲग्रीकल्चर, कॅटल फार्म व बहुउपयोगी शेतीयंत्र” हे उपकरण सादर केले. या प्रकल्पास माध्यमिक गटातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
*मान्यवरांच्या हस्ते गौरव*
या यशाबद्दल विद्यार्थ्यांना व शिक्षकांना
प्रकाशजी नांगरे (उपशिक्षणाधिकारी – माध्यमिक),
अनिल बनसोडे (शिक्षण निरीक्षक – माध्यमिक),
लक्ष्मीप्रसाद मोहिते (संचालक, महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक),
संजय भस्मे (समन्वयक, बालवैज्ञानिक प्रदर्शन, सोलापूर),
संजय जवंजाळ (सह-समन्वयक, बालवैज्ञानिक प्रदर्शन, सोलापूर)
यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
















