वळसंग : अक्कलकोट शहरातील हन्नूर रस्ता ब्रिज खाली रात्री गाडीला अडवून पाच लाखाची खंडणी मागणे तसेच धारदार शस्त्राने फिर्यादीवर हल्ला करणाऱ्या आरोपीस ॲड. संजय गायकवाड यांनी आपल्या युक्तीवादातून आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आली आहे.
संपूर्ण हकीकत असे की, कर्नाटक राज्यातील गाव भुयार तालुका इंडी जिल्हा विजयपूर येथील रहिवाशी असणार्या बिरप्पा भाजप्पा तडलगे, लिंगप्पा बिरप्पा पुजारी, शंभू श्रीशैल तडलगी, जक्कप्पा सिद्धप्पा नरोटे, गंगाधर शांतप्पा रेवगोळे या लोकांनी हातात धारदार शास्त्र घेऊन फिर्यादी कांतप्पा पुजारी राहणार हुवनहळ्ळी तालुका अलमेल जिल्हा विजयपूर यांची पांढरा रंगाची वेनु होंडा गाडी क्रमांक KA २८ MA ७१३० ही गाडी अक्कलकोट शहरातील हन्नूर ब्रिज खाली रात्री अडवून गाडी फोडून गाडीतील फिर्यादी व त्यांच्या साथीदारांना मारहाण करून तुला धंदा करायचा असेल तर मला पाच लाख रुपये हप्ता दे नाही दिल्यास तुला जीवे ठार मारतो अशी धमकी दिल्याची फिर्याद अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे मध्ये आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६१/२,१२६/२,३०८/४,३०८/२,३२४/४,१८९/२,१९१/२,१९१/३ व १९० या कलमान्वये सर्व आरोपीवर गुन्हा दाखल केला होता.
ॲड. संजय गायकवाड यांनी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री केंद्रे साहेब यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले होते. आरोपी क्रमांक एक बिराप्पा भाजप्पा तडलगे यांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने मंजूर केला.यातील आरोपी तीन ते पाच यांना रेग्युलर जामीन या अगोदर झाला होता. ॲड. संजय गायकवाड यांनी आरोपी क्रमांक एक ते पाच आरोपीतर्फे काम पाहिले.

















