माळीनगर – रोटरी क्लब अकलूज, सासवड माळी शुगर फॅक्टरी व परिसरातील सर्व संस्था, कृष्णा चारिटेबल हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर (कराड) यांच्या संयुक्त विद्यमाने कारखान्याच्या गेस्ट हाऊस मध्ये मोफत कर्करोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात 110 जणांची तपासणी करण्यात आली. शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर प्रदीप जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वल करून करण्यात आले. यावेळी रोटरीचे अध्यक्ष केतन बोरावके ,उपाध्यक्ष अजिंक्य जाधव, कारखान्याचे चेअरमन राजेंद्र गिरमे ,मॅनेजिंग डायरेक्टर गणेश इनामके ,शुगरकेन सोसायटीचे चेअरमन अमोल ताम्हाणे ,एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अजय गिरमे, ग्रामपंचायत सरपंच अनुपमा एकतपुरे व्यासपीठावर उपस्थित होते.
कारखान्याचे कर्मचारी, ऊसतोडणी महिला कामगार, मॉडेल हायस्कूल व गुलमोहर इंग्लिश स्कूल मधील महिला शिक्षिका तसेच शिक्षक, परिसरातील नागरिक अशा एकूण 110 जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कॅन्सर याची प्राथमिक तपासणी करून तपासणी बरोबरच कॅन्सरची लक्षणे प्रतिबंधक उपाय योजना वेळेवर निदानाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी रोटरीचे अध्यक्ष केतन बोरावके बोलताना म्हणाले एक्सप्रेस कॅन्सर डिटेक्शन व स्क्रीनिंग अवरनेस हा अत्यंत महत्त्वकांक्षी व मनाला स्पर्श करणारा प्रकल्प साकारत आहे. हा उपक्रम म्हणजे केवळ तपासणी शिबिर नाही तर अनेक महिलांच्या आयुष्यात आशेचा किरण भविष्यासाठीची सुरक्षिततेची जाणीव आणि आरोग्य विषयीचा जागरूकतादीप आहे. या प्रकल्पाचे प्रमुख पृथ्वीराज भोंगळे संचालक कल्पेश पांढरे, डॉ. अभिजीत मगर, संदीप लोणकर, बबनराव शेंडगे, अजित वीर, प्रविण कारंडे, राजू बनकर, आशिष गांधी आदी रोटरीयन यांनी परिश्रम घेतले. आभार अजिंक्य जाधव यांनी मानले.
रोटरी क्लबच्या वतीने मोफत कॅन्सर आयोजित शिबिराचे उद्घाटन प्रदीप जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी कारखान्याचे चेअरमन राजेंद्र गिरमे मॅनेजिंग डायरेक्टर गणेश इनामके, शुगरकेध सोसायटीचे चेअरमन अमोल ताम्हाणे ,एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अजय गिरमे ,ग्रामपंचायत सरपंच अनुपमा एकतपुरे ,उपाध्यक्ष अजिंक्य जाधव उपस्थित होते
















