सोलापूर – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत. तोपर्यंत ही योजना चालूच राहणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी काळजी करण्याचे कारण नाही. सोलापूर शहराचा चौफेर विकास होण्यासाठी भाजपच्या अधिकृत उमेदवारांना महापालिकेत पाठवा असे आवाहन देखील यावेळी भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी केले.
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १७ मधील भाजपच्या अधिकृत उमेदवार निर्मला हरीश जंगम, भारतसिंग विठ्ठलसिंग बडूरवाले, जुगनबाई शमशेरसिंग आंबेवाले, रवी शंकरसिंग कय्यावाले यांच्या प्रचारार्थ बेडर पूल लष्कर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सुमित पाटील, माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे, जेम्स जंगम आदींसह समाजाचे जेष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी देवेंद्र भंडारे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना विकासासाठी भाजप उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.
दरम्यान भाजपचे अधिकृत उमेदवारांनी देखील सोलापूरच्या विकासासाठी पुन्हा एकदा महापालिकांवर भाजपचा झेंडा फडकवण्याचे आवाहन केले.
यांनी दर्शवला पाठिंबा.
याप्रसंगी भाजपच्या अधिकृत उमेदवारांना नवदुर्गे प्रतिष्ठान लष्कर सोलापूर यांनी पत्र प्रसिद्ध करत जाहीर पाठिंबा दर्शवला. याप्रसंगी निलेश बंबईवाले, सागर बंबईवाले, विनायक सोनगेवाले, विजय लंगडेवाले, गोविंद मनसावाले उपस्थित होते. त्याचप्रमाणे श्री राम राज्य प्रतिष्ठान मंडळाने देखील जाहीर पाठींबा दर्शविला.
या प्रसंगी अजय मनसावाले, तुषार परदेशी,विवेक लंगडेवाले, किरण बोकेवाले, गणेश बाबावाले, रोहन बंबईवाले, रोहित मनसावाले आदींची उपस्थिती होती.तसेच दिशा सामाजिक संस्थेने देखील उमेदवारांना पाठिंबा दिला. संस्थेचे अध्यक्ष डॉ.योगेश पलोल्लू, नरसिंग पंदिरोलू , नरसिंग मिसालोलू यांची उपस्थिती होती. संपूर्ण पॅनलला लष्कर भागातील विविध मंडळांनी जाहीर पाठिंबा देण्यात आल्याने भाजपचा उमेदवारात आणि प्रभागात उत्सवाचे वातावरण पसरले.
























