बार्शी – बार्शीत प्रथमच विश्व हिंदू परिषद बजरंग दल बार्शी प्रखंड जि. सोलापूर द्वारा आयोजित शौर्य संचलन शनिवार दि. १० जानेवारी रोजी झाले. सदर शौर्य संचलन कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणुन बजरंग दलाचे राष्ट्रीय सह संयोजक विवेक कुलकर्णी, विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष गजानन धरणे, विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण, बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांत सह संयोजक संदेश भेगडे, भगवंत मंदिर ट्रस्ट सदस्य मुकुंद कुलकर्णी यांच्यासह सोलापूर विभाग, सोलापूर जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
्शौ्श्शौ््शौ्श्शौ् शैर्य_संचलन भगवंत मैदान येथून निघून पुढे महाद्वार चौक, वीर सावरकर चौक, पटेल चौक, ऐनापूरे मारुती चौक, आर.एस.एम. हाइट, मल्लाप्पा धनशेट्टी रोड मार्गे, शाहीर अमर शेख चौक, पांडे चौक, नगरपरिषद, नरवीर तानाजी चौक, संकेश्वर उद्यान, एकवीराई चौक मार्गे भगवंत मंदिर येथे समारोपाचा कार्यक्रम झाला.
”देश का बल. बजरंग दल” जय श्रीरामच्या घोषणांनी बार्शी शहर दुमदुमून गेले. मोठ्या शिस्तीत निघालेल्या संचलनात बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिस्तबद्ध शौर्य संचलन पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी झाली होती, चौकाचौकात नागरिकांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली.
हा कार्यक्रमास विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री बापूसाहेब कदम, प्रखंड मंत्री अमर शुक्ला, सहकार मंत्री गोविंद शिंदे, बजरंग दल प्रखंड संयोजक शिरीष जाधव, प्रखंड प्रचार प्रसार प्रमुख ऋषीकेश भुजबळ यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.





















