सोलापूर – हत्तूर येथील सोमेश्वर व बनसिध्देश्वर यात्रेनिमित्त १२ जानेवारी ते १५ जानेवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहीती यात्रा कमिटी सदस्य व शिवसेना जिल्हा उपप्रमुख णप्पा सतुबर यांनी दिली.
सोमवार १२ जानेवारी रोजी तैलाभिषेक व नंदीध्वज अभिषेक , मंगळवार
१३ जानेवारी रोजी भोगी व अक्षता सोहळा कलगी तुर्याचे गाण्याचा कार्यक्रम होणार आहे. बुधवार १४ जानेवारी रोजी नंदीध्वज व पालखी मिरवणूक होऊन होम कार्यक्रम पार पडणार आहे. गुरुवार
१५ जानेवारी रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जंगी मल्लांच्या कुस्त्या होणार असून यावेळी ५१ हजार रूपयांपर्यंत बक्षिस देण्यात येणार आहे. तर रात्री कन्नड सामाजिक नाटकाचे आयोजन करण्यात आला आहे.
दररोज यात्रा कमिटीकडून भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. भक्तांनी कार्यक्रमांचे लाभ घेण्याचे आवाहन यात्रा कमिटीकडून करण्यात आला आहे. यावेळी शिलीसिद्ध महाराज, सोमनिंग कनपवडीयार, राजशेखर भरले, बापूराव उपासे, बापू पाटील, गुरप्पा कुलकर्णी , गुरप्पा पटवडीयार, बंदप्पा पाटील ,ॲड. केदार डोळे, सोमनिंग नायकोडे, ईरप्पा म्हेत्रे, सूर्यकांत नायकोडे , शिवानंद पाटील, अप्पू पाटील , बनसिध्द भिंगे , नीलप्पा उपासे, संगप्पा निंबर्गी, सोमनिंग कोळी , ज्योतप्पा सिनेवडीयार, बंदेनवाज मुल्ला आदी उपस्थित होते.






















