मोहोळ – पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मोहोळ तालुकाध्यक्ष पदी गोरख सरवदे यांची निवड करण्यात आली आहे.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खा.प्रा. जोगेंद्र कवाडे सर,राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांच्या आदेशान्वये जिल्हाध्यक्ष अमित कांबळे यांनी ही निवड केली.जिल्हाध्यक्ष कांबळे यांनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या सोबत फोनद्वारे चर्चा करून गोरख सरवदे यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.यावेळी जयदीप कवाडे यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत करून फोन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे शहर अध्यक्ष शरणू हजारे,जिल्हा युवक अध्यक्ष विश्वजित सरवदे,जिल्ह्याचे संपर्क प्रमुख महिबुब शेख,शहर संघटक सद्दाम भाई पठाण,सामाजिक कार्यकर्ते व मैत्री युथ फाऊंडेशनचे अण्णा भाऊ डोळसे,जिल्हा युवक नेते वाहिद मुस्तफा,दाऊद मुलानी,नबिसा शेख,ज्येष्ठ नेते दत्ता राऊत,शहर संपर्क प्रमुख विकी बनसोडे,मीडिया प्रमुख राज सोनवणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.






















