ट्विटरचे मालक एलोन मस्कयांच्या पावलावर पाऊल ठेवत फेसबुकचे सह-संस्थापक आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग आता ब्ल्यु टिक साठी नवा नियम आणणार आहे. फेसबुकच्या ग्राहकांसाठी व्हेरिफाईड सबस्क्रिप्शन सेवा असून या साठी ट्विटर पेक्षाही अधिक पैसे वापरकर्त्यांना द्यावे लागणार आहे.
Facebook Blue Tick: ट्विटर अधिग्रहीत केल्यावर इलॉन मस्कने अनेक नवे बदल ग्राहकांच्या सुविदहेत केले होते. यात ब्ल्यु टिकचा देखील समावेश होता. आधी फ्री असलेल्या या सेवेला पैसे मोजावे लागत आहे. इलॉन मस्कयांच्याच पावलावर पाऊल ठेवत आता फेसबुकचे सह-संस्थापक आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी देखील ब्ल्यु टिक साठी नवी घोषणा केली असून या सेवेसाठी वापरकर्त्यांना फेसबुकला पैसे द्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे या साठी ट्विटर पेक्षाही अधिक पैसे मोजावे लागणार आहे.
व्हेरिफाईड सबस्क्रिप्शन सेवे संदर्भात रविवारी मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक पोस्टद्वारे या नव्या सबस्क्रिप्शन सेवेची घोषणा केली. ‘या आठवड्यात आम्ही मेटा व्हेरिफाईड लॉन्च करत आहोत, ही की सबस्क्रिप्शन सेवा तुमचे सरकारी आयडी व्हेरिफाईड करून सुरु करू शकाल, असे झुकरबर्ग यांनी त्यांचा पोस्टमध्ये लिहिले आहे. फेसबुक वापरकर्ते ब्लू टिक आणि बनावट खात्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी थेट या सेवेचा लाभ घेऊ शकतात.
या सेवेसाठी ग्राहकांना ट्विटर पेक्षाही जास्त पैसे मोजावे लागणार आहे. झुकरबर्ग यांनी त्यांच्या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार या ब्ल्यु टिक सेवेसाठी युजर्सला दर महिन्याला ११.९९ डॉलर्स म्हणजेच ९९२ रुपये आणि iOS वरील सेवेसाठी १४.९९ डॉलर्स म्हणजेच १२४० रुपये प्रत्येक महिन्याला द्यावे लागणार आहेत.
ही सेवा या आठवड्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सुरू होणार आहे. टप्या टप्पाने ही सेवा सर्व देशांत सुरू केली जाणार आहे. भारतात ही सेवा कधीपासून लागू होईल याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.